गुरुवार, 12 नवंबर 2015

असेच काही आयुष्यातले धडे-१

आपला सुवर्णकाळ असताना यश,समृध्दी,लक्ष्मी यांची कृपादृष्टी आपल्यावर असते थोडक्यात आपल्या सुखाच्या दिवसात आपली अखंड बडबड ऐकायला सगळेच असतात.
" काय बरोबर बोललास राव अगदी बरोबर ' हे सुरात सूर असतात.
आपल्या कडून झालेली मदत ते चारचौघात कधीच सांगणार नाही.आपले आणि त्यांचे नाते खूप जवळचे असते.

पण.....

काही कारणाने काही काळासाठी आपण अडचणीत येतो त्यावेळच्या संकटकाळात आपले मनातील दुःखाचे दोन शब्द ऐकताना "तुझे काय घेऊन बसलाय आमचे मागे टेन्शन काय कमी आहेत का? माणसाने कसे खंबीर असावे." असे बोलणे ऐकावे लागते आणि वर
त्यांनी आपल्याला केलेली छोटीशी मदतहि उपकार म्हणून चारचौघात जाहीरपणे सांगतात.आपले आणि त्यांचे नाते तसे जरा दुरचेच असते.

आपला चांगला काळ परत येताच यांना आपले नाते किती जवळचे आहे हे परत आठवते.

शुक्रवार, 25 सितंबर 2015

स्क्रिन शॉट भाग -५

आतापर्यंत..... आता आपण नेमके काय करावे असा तो विचार करत असतानाच अचानक त्याच्या पाठिवर कोणीतरी हात ठेवला. आणि अमितला परत एकदा जबरदस्त धक्का बसला आणि तो मोठ्याने ओरडला..... " शक्यच नाही ?" पुढे चालु.... स्क्रिन शॉट भाग -५ "शक्यच नाही ? " जिने आपल्या वॉलवर स्क्रिन शॉट टाकला ती अभिषा व तिच्या सोबत सुधीर, जगदीश, विशाल, सुषमा,नेहा,सोहम,सार्थक सगळे एकत्र पाहुन अमित आश्चर्यचकित झाला त्याला त्या वाक्यानंतर काहिच बोलता येत नव्हते. असेच काही मिनिट शांततेत गेले आता अमित बराच सावरला कोणीच काही बोलत नाही असे पाहुन अमितने बोलायला सुरुवात केली अमित " तुम्ही सगळे इथे कसे काय?" सुधीर " आता किती वाजले आहेत माहीत आहे का?" अमित " का? असे का विचारतोस ?" सुधीर " संध्याकाळचे ५ वाजले आहेत." विशाल " तू सकाळी घरातून बाहेर पडला आणि गाडीवर बसून इकडे निघाला तेंव्हापासून सोहम व साईराज तुझ्या मागे होते." अमित "काय?" त्याला मधेच थांबवत सुधीर बोलू लागला. " सकाळी ९ वाजता तू इथे आला आहेस आणि तुझ्या मागोमाग सोहम व साईराज आले आहेत.तेंव्हा पासून ना तू पाणी पिलास कि ना काहि अन्न घेतले आहेस आणि त्यामुळे तुझ्यासह हे दोघेही उपाशीच आहेत.अगोदर आपण सर्वजण काहितरी खाऊन घेऊया." हे ऐकताच सकाळ पासून तणावात असलेल्या अमितला भुकेची नाही पण आपल्याला तीव्र तहान लागल्याची जाणीव मात्र झाली. अमित "मला थोड़े पाणी मिळेल का?" सुषमाने आपल्याकडील पाण्याची बाटली अमितला दिली. सुषमा " हळू हळू पाणी पी एकदम पिलास तर त्रास होईल." अमितने तिच्या सांगण्यानुसार सावकाश पाणी पिले आता सर्वजण शांतपणे टेकडी उतरु लागले. आता सगळे हॉटेल शिवसागर मध्ये शांतपणे नाष्टा करत होते. पण खरेच सगळे शांत होते का? या दिवसभरात नेमके काय घडले आहे? हे सगळ्यांनाच एकमेकांकडून जाणून घ्यायचे होते. सुधीर तसा गृपचा लिडर होता. आता सुध्दा त्यानेच बोलायला सुरुवात केली. सुधीर " आम्हाला सुध्दा ते मेसेज आले आहेत. म्हणजे जो पर्यंत हे सगळ्यांनाच आलेत हे एकमेकांना समजण्यासाठी पहाटे पर्यंत वेळ गेला. अगोदर आम्ही सुध्दा शॉक झालो.पण रात्री 12.30 नंतर अतिशय महत्वाचे काम असेल तरच तुझा मोबाईल व नेट चालु असते हे आम्हाला माहीत आहे." अमित " मला नाही समजले " सुधीर "तसे पाहिले तर आपल्या गृप मधिल प्रत्येकाचे गुण, दोष आपल्याला माहीत आहेत. कोण कसा आहे? कशी वेळ आल्यावर तो कसा वागेल? याचा आपल्याला एक अंदाज असतो. हे अंदाज अपवादात्मक परिस्थितीत मात्र बदलू शकतात. मात्र असे काही घडलेले नसताना हा प्रकार का घडला? यात तूच आहेस कि दुसऱ्या कोणी हे केले आहे? हे आम्हाला सुध्दा शोधायचे होते." अमित " मी नाही समजलो" विशाल " हा विषय कोणी ना कोणी ऑनलाईन आणल्या नंतर तुझी बदनामी होणारच होती." अमित " मग आता अजुन काय बाकी राहिले आहे. जे काही व्हायचे ते होऊन गेले कि" सुधीर " अरे यासाठीच आम्ही अभिषाला ती स्क्रिन शॉटची पोस्ट करायला सांगितली होती." अमित " म्हणजे?" विशाल " अरे अभिषा नेहमी कविता,ललित लेखन, कथा असे सगळेच लेखन अगदी ऑर्कुट पासून करत आहे.आज आपल्या सर्वांपेक्षा तीची फ्रेंड लिस्ट व फॉलोअर यांची संख्या जास्त असल्याने सर्व फ्रेंड्सना तिच्या पोस्टचे नोटिफिकेशन जाणार आणि ज्यांना ज्यांना हे मेसेज आलेत ते तिच्या पोस्टवर एकत्र येणार हे आम्ही ओळखून तिला पोस्ट करायला सांगितली." अमित " फ्रेंड्स तुम्ही हे काय केले? अरे ज्याला मेसेज नाही गेले त्याला सुध्दा ह्या प्रकाराविषयी समजलेच ना." सुधीर " जेंव्हा वेगवेगळ्या अकाउंट वरुन ह्या प्रकाराची पोस्ट आल्या असत्या तर अगदी तसेच झाले असते. मग कोण काय म्हणते आहे? नेमक्या किती जणांना ते मेसेज आले आहेत हे आपल्याला कसे समजणार होते? आणि सगळ्यात महत्वाचे सोशल नेटवर्कवर एखाद्या वेगळ्याच विषयाची पोस्ट पहिली येते आणि जिथे एखादा चांगला असो वाईट असो विषय येतो तिथे त्यात इंटरेस्ट असणारे जमा होतात. आणि काहितरी गरमागरम होत असेल तर तिथे तर अगदी हौश्या, नवश्या यांची जत्रा भरते. आणि आम्हाला सुध्दा तेच हवे होते जेणे करुन हा विषय मोठ्या प्रमाणात आपल्याच नजरे खाली होईल आणि त्याला कसे वळण द्यायचे ते आपल्याच हातात असेल." अमित " एवढे सगळे करुन काही साध्य झाले का? माझी व्हायची ती बदनामी झालीच आहे कि " सुधीर " टेंशन सोड.आम्ही तुझ्या सपोर्टरचा एक गृप केला.आणि ज्याला जसे शक्य आहे त्यांनी काय करायचे? हे काम विभागुन घेतले आणि सगळ्यांच्या प्रयत्नाने हा काय प्रकार आहे,आणि कसा घडवला गेला हे सगळे आता समोर आले आहे." विशाल "अभिषाच्या पोस्टवर आम्ही या विषयी सगळे सविस्तर लिहिले असून आतापर्यंत तू निर्दोष आहेस हे जवळपास सगळ्यांनी मान्य केले आहे." हे ऐकून अमितला अतिशय आनंद झाला आपण आता काय बोलावे हे त्याला समजेना. विशाल " आम्हाला सकाळ पर्यंत वेळ दे या प्रकारामागे कोण आहे? हे उद्या आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे." क्रमशः

स्क्रिन शॉट भाग -४

आतापर्यंत ..... मेहुणी " अहो हे काय तूमचे नाव मला 'People You May Know' मध्ये तुमचे नाव आणि प्रोफाईल पिक्चर दिसत आहे.अहो थांबा इथे तर तुमचे ३-४ सेम टु सेम नावे आणि फोटो दिसत आहेत." झाले अमितच्या हातातून मोबाईल खाली पडला आणि त्यासोबत अमितही डोक्याला हात लावून खाली बसला.... त्याच्या तोंडातून बाहेर आलेले शब्द होते... "अरे बापरे !!! आता हे काय नविन लफडे आहे." पुढे चालु..... स्क्रिन शॉट भाग -४ ह्या मेसेज,स्क्रिन शॉट, नंतर सेम टू सेम प्रोफाइल्सने अमित साठी आजचा दिवस या वेळे पर्यंत तरी एका मागोमाग एक धक्के देणाऱ्या भूकंपाचा ठरला होता. म्हणतात ना सलग मिळणाऱ्या सुखाने माणूस आळशी आणि दुःखाने कणखर बनतो. अगदी तसेच आता अमितचे सुध्दा झाले होतेे.त्याने फेसबुक अकाऊंट ओपन करुन नेमके काय झाले आहे हे पहायचे ठरवले.त्याने स्क्रिन वर नजर टाकताच त्याला SMS, मेसेंजर व व्हाट्स अप वर आलेले नोटिफिकेशन्स दिसले.आता त्याने प्रथम नोटिफिकेशन्स वाचायचे ठरवले आणि एक एक मेसेज वाचु लागला तसे आपण समजतो तसे एकटे पडलेलो नाही याची त्याला जाणीव झाली. कितीतरी मित्र- मैत्रिणी, सहकारी,नातेवाईक त्याला सपोर्ट करत असल्याचे त्यांनी कळवले तर होतेच पण वेगवेगळ्या गृपवरील मित्र असलेले सुधीर,जगदीश,विशाल,सुषमा,नेहा/सोहम,सार्थक अजुन बरेचसे असे जवळचे मित्र एकत्र येऊन अमितसाठी " i am with amit " नावाचा एक सपोर्ट गृप तयार करुन त्यावर त्यांनी कामाची विभाजणी सुध्दा केली होती. अमितने त्या गृपवरील पोस्ट आणि कमेंट्स वाचायला सुरुवात केली आणि आपण आभासी जग म्हणून सर्वांबाबत किती चुकीचा विचार करत होतो हे त्याला जाणवले. सर्वात पहिली त्याने पिन पोस्ट पाहिली त्यात लिहिले असे लिहिले होते कि " Hi Friends आज सकाळी नेहमी प्रमाणे आपण सर्वजण फेसबुकवर आलो ते कोणी सवयी प्रमाणे तर कोणी आलेल्या मेसेज वा कॉलमुळे आलो. आजची सकाळ हि आपल्या सर्वांना तशी धक्का देणारी ठरली आहे. आपला मित्र अमित याचे अकाऊंट वरून काही आक्षेपार्ह मेसेज असलेले स्क्रिन शॉट काहिजणांनी आपल्या वॉलवर टाकले आणि अमितला त्या बद्दल जाब विचारला आहे.फ्रेंड्स अमित असे करू शकतो का? हा प्रश्न स्वतःला विचारा जर नाही असे वाटत असेल तर आम्हाला मदत करा. आता मदत म्हणजे नेमके काय करायचे आहे हे आम्ही तुम्हाला इनबॉक्स मध्ये पाठवतो." हे सर्व वाचून झाल्यावर अमितला आता नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रु वाहु लागले. हे आनंदाचे होते कि अजुन कसले हे मात्र तो सुध्दा सांगु शकला नसता. आता आपण नेमके काय करावे असा तो विचार करत असतानाच अचानक त्याच्या पाठिवर कोणीतरी हात ठेवला. आणि अमितला परत एकदा जबरदस्त धक्का बसला आणि तो मोठ्याने ओरडला " शक्यच नाही ?" क्रमशः

स्क्रिन शॉट भाग - ३

आतापर्यंत .... १) त्याचे अकाउंट कोणीतरी हॅक केले होते.२)कोणालातरी त्याचा पासवर्ड माहीत झाला आणि त्याने हे केले आहे.३)कसलातरी वायरस आहे ज्याने असे मेसेज फॉरवर्ड झाले.४) किंवा असे काहितरी घडले आहे जे सध्या तरी आपल्या आकलना पलीकडे आहे. आता या चार पैकी एका कोणत्या तरी एका कारणाने हे सगळे घडले आहे आणि तेच तर आपल्याला शोधायचे असे त्याने ठरवले. येथून पुढे ..... स्क्रिन शॉट भाग - ३ सोशल नेटवर्क एक आभासी असणारे जग कधी आपल्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत आले हे आपल्याला कधी समजलेच नाही असा विचार अमितच्या मनात आला आणि खरेच आपण आपल्या फ्रेंडलिस्ट मध्ये आपल्या बालपणाचे,शाळा,कॉलेज मधिल मित्र-मैत्रिणी कामातील सहकारी एवढेच नव्हे तर त्यांचे मित्र नातेवाईक सुध्दा जॉईन केले.यातील काहींना घेऊन वेगवेगळे गृप सुध्दा तयार केले.आपणच प्रत्यक्षातील नाती आभासी जगात नेऊन ठेवली आहेत असे तर नाही ना? तसे पाहिले तर 1980 ते 90 च्या दशकात जन्मलेले सर्वजण एका सिमारेषेवरच जन्मले आहेत असे त्याला वाटू लागले. हो ना 90 च्या उत्तरार्धात म्हणजे तसे पाहिले तर या पिढीच्या अनुकरण करण्याच्या, संस्कार होण्याच्या काळातच जगाने आर्थिक,वैज्ञानिक,तांत्रिक इत्यादि सर्वच क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली. एकत्र कुटुंब पध्दत,गावपण एवढेच काय आई वडील हे सुध्दा " स्टेटस " या शब्दामागे धावु लागले.पूर्वीची संस्कार करणारी लक्ष देणारी मोलाच्या गोष्टी करणारी अनुभवाची बोल सांगणारी नाती, समजून घेणारी आहे तसे स्वीकारणारी कट्टा,नाका यावरची मंडळी जाऊन आभासी जगातील नाती,गृप्स तयार झाले आणि एका लाईक, कॉमेंट्सवर इथली नाती/मैत्री ठरवू लागली. हो हाच अनुभव तर अमित आता घेतच होता कि एवढ्या सर्वांमध्ये आतापर्यंत कोणीही त्याला साधा फोनहि केला नाही. "अमित तू असे काही करू शकत नाही हे मला माहीत आहे." "अमित काय खरे काय खोटे हे नंतर पाहू पण आता मी तुझ्या बरोबर आहे काळजी करू नकोस" "अमित गाढवा हे काय केलेस?चल माफ़ी माग सर्वांची" अरे माझे कान पकडले जरी असते,मला दोन-चार फटके लगावले असते तरी मला बरे वाटले असते रे.पण नाही हे आभासी जग खरेच एका फटक्यात गायब झाले कि मी त्यांच्या या जगात आहे कि नाही हे मलाच समजेनासे झाले आहे.असा विचार अमितच्या मनात आला. परंतु आता हे विचार करुन काय फ़ायदा आहे आल्या परिस्तिथीत काय करायचे हे महत्वाचे आहे आणि आपल्याला एकट्यालाच यावर विचार करावा लागणार आहे नव्हे शक्यतो एकट्यालाच लढावे लागणार हे त्याने ओळखले आणि अमित आता चारही मुद्द्यांवर विचार करू लागला.या चार पैकी एक एक मुद्दा वेगळा करून त्यावर विचार करायचे त्याने ठरवले. अमितने आता पहिला मुद्दा विचारात घेतला. आपले अकाउंट खरेच हॅक झाले का? नाही फेसबुकची सुरक्षितता पाहता फेसबुक अकाउंट हॅक होणे हि शक्यता खुप कमी आहे. आणि जरी हॅक झाले असे समजले असते कारण सकाळी ते आपल्याला सुरु झालेच नसते.चला आता हि शक्यता बाद. दूसरा मुद्दा आपला पासवर्ड कोणाला तरी मिळाला. शक्यता आहे का? अशी बहुतेक शक्यता नाही कारण फेसबुक मोबाईल ऍप मुळे लॅपटॉप,डेस्कटॉप या पेक्षा आपण फेसबुक मोबाईल वरच वापरतो आहोत.आणि अकाऊंट लॉगिन नोटिफिकेशन मुळे दुसऱ्या कोठेही अकाऊंट सुरु झाले तर आपल्याला तसे नोटिफिकेशन येणार आहे. मग हि शक्यता सुध्दा नाही. मुद्दा तिसरा.... कसला तरी वायरस असणार.... वायरस असू शकतो का? अरे नाही वायरस असेल तर सर्वानाच मेसेज गेला पाहिजे इथे फ़क्त ठराविक लोकांनाच् मेसेज गेला आहे. म्हणजे हि सुध्दा शक्यता नाही. मुद्दा नंबर चार..... असे काहितरी घडले आहे जे सध्यातरी आकलना पलीकडे आहे. म्हणजे नेमके काय असेल बरे? अचानक कोठुन तरी मोबाईल रींगचा आवाज येऊ लागला.नाही हा तर अमितचाच मोबाईल वाजत होता.त्याने नंबर न पाहताच मोबाईल कानाला लावला आणि पलिकडून " का रे बाबा मोठा माणूस झालास कि काय? मला फ्रेंड लिस्ट मधून का काढलेस?" असा आवाज आला. अमितला क्षणभर काहिच समजले नाही. त्याने मोबाईल वर बोलाणाऱ्यास धडधड़त्या मनाने विचारले " कोण बोलत आहे? आणि फेसबुकचे काय झाले आहे? " समोरून आवाज आला " शाब्बास स्वतःच मला अन्फ्रेंड केलेस आणि आता फोनवर सुध्दा अन्फ्रेंड करतोस का रे? अरे मी सुन्या बोलतोय. " सुन्या ?आता कोण हा सुन्या ? आणि हे काय आता नविन लफडे आहे? जाऊ द्या नको हि कटकट असे बोलत अमितने मोबाईल वरील कॉल कट केला. अर्ध्या मिनिटातच परत रिंग झाली. पण आता अमितने नंबर पाहिला तर तो एका खुप जुन्या पण सध्या संपर्कात नसलेल्या मित्राच्या मोबाईलचा होता.घेऊ का नको?घेऊ का नको? चला पाहुया हा काय बोलतोय?आता पर्यंत इतके धक्के बसले आहेत कि आता मनाची पूर्ण तयारी झाली आहे. अमित " हॅलो " समोरून " क्या बॉस ?पुरानी यारी भूल गये क्या? अपुन मुन्ना बोल रहा है. " अमित " अरे मुन्ना बोल ना भाई कैसे क्या फोन किया? " मुन्ना " बॉस यार अपुनका फेसबुक तुमनेच खोल दिया ना बॉस और अब्बी तुमीच अपुनको निकाल दिया." अमित " नहीं रे मुन्ना ऐसा कुछ नहीं वो ज़रा फोन बदली किया ना तो तुम्हारा नाम गायब हुआ होगा मैं वापस तुम्हे फ्रेंड करता हूँ " मुन्ना " ओके बॉस जरूर करना." अमितने हा कॉल सुध्दा कट केला आणि तो ह्या नविन अनफ्रेंड प्रकारणाविषयी विचार करू लागला आणि परत मोबाईल वाजला. आता आणि हे कोण?असा विचार करत त्याने फोन घेतला " हॅलो ....हे काय भावजी मला अनफ्रेंड का केले हो?" सर्वात लहान मेहुणी बोलत होती. अमित आता बराच सावरला " मी अनफ्रेंड केले हे तुला कसे समजले?" मेहुणी " अहो हे काय तूमचे नाव मला 'People You May Know' मध्ये तुमचे नाव आणि प्रोफाईल पिक्चर दिसत आहे.अहो थांबा इथे तर तुमचे ३-४ सेम टु सेम नावे आणि फोटो दिसत आहेत." झाले अमितच्या हातातून मोबाईल खाली पडला आणि त्यासोबत अमितही डोक्याला हात लावून खाली बसला.... त्याच्या तोंडातून बाहेर आलेले शब्द होते... "अरे बापरे !!! आता हे काय नविन लफडे आहे." क्रमशः

स्क्रिन शॉट भाग - २

आतापर्यंत..... असभ्य भाषेतील वेगवेगळ्या प्रकारचे मेसेंजर वरील मेसेजचे स्क्रिन शॉट पाहुन........छातीत आलेली कळ,धूसर झालेली नजर आणि फुटलेल्या घामाने हार्ट अटॅक आल्यावर जशी अवस्था होते तशी त्याची अवस्था झाली. पुढे चालु..... नखशिखांत हादरलेला अमित आता त्या बसलेल्या धक्क्यातून सावरु लागला. जसजसे मन आणि बुध्दी स्थिर होऊ लागली तसे त्याने सर्वप्रथम आपले फेसबुक अकाऊंट लॉगआउट करुन नेमके काय घडले असू शकते याच्या विचारात गुंतवले. काल रात्रीच अमित व त्याचे काही मित्र एका पोस्टवर कॉमेंट्स मध्ये हँसी मजाकची मस्ती करत होते. रात्रीचे 12.15 वाजले आणि सकाळी लवकर उठायचे आहे या विचाराने चाललेली धिंगा मस्ती सोडून घरातील नियमानुसार मोबाईल वरील डाटा बंद केला आणि फोन व्हॉइस मेल वर टाकून तो झोपला होता. एका रात्रीत म्हणजे रात्री 12.30 ते 1 वाजल्या नंतर सकाळी 7.30 पर्यंतच्या वेळेत असे काहितरी घडले ज्याने त्याच्या अकाऊंट वरुन एवढ्या सर्वांना मेसेज गेले आहेत.पण कसे?कोणी केले? का आपणच झोपेमध्ये केले? छे !!! काहिच सुचेना उलट जसजसा आपण तो विचार करतोय तसे अजुनच गोंधळतोय असे त्याच्या लक्षात आले आणि मग त्याने बाथरूम मध्ये जाऊन चेहऱ्यावर पाणी मारले. आता त्याच्या मनावरील ताणाचा भार परत एकदा कमी झाला. आपण कोणाशी तरी या विषयावर बोलले पाहिजे असे त्याला वाटू लागले पण कोणाशी बोलावे? हा प्रश्न आता समोर आला. हे मेसेज आणि त्याची पडलेली पोस्ट,त्या पोस्टवर वरील कॉमेंट्स या घडलेल्या कि कोणीतरी घडवून आणलेल्या घटनेने अमित मात्र अडचणीत आला होता याची अमितला आता पुरेपूर जाणीव झाली.निसर्गानियमानुसार त्या घटने पासून दूर पळणे किंवा तिचा सामना करने अमितला क्रमप्राप्त झाले. दूर पळण्याचा विचार म्हणजे आपणच सर्व केले याची कबूली देणे आहे हे अमितच्या लक्षात आले आणि आता त्या घटनेचा सामना करणे हा एकच मार्ग समोर आहे याची त्याला जाणीव झाली. बस्स !!! आता जास्त विचार करायचा नाही. कारण त्याच विचारात गुरफटलो तर मार्ग काढणे अवघड होईल म्हणून स्क्रिन शॉट प्रकारणाने जड झालेले डोके शांत करण्यासाठी शांतता आणि एकांत मिळावा असे शहरात असूनही शहरी गजबजाट,गोंधळा पासून दूर असलेले बाणेर मधिल टेकडीवर असणारे तुकाई मंदिरात जाण्याचे अमितने ठरवले.अमित घरात मी जरा मंदिरात जाऊन येतो असे बोलून आपल्या टू व्हिलरवर निघाला. नुकताच पाऊस झाल्यामुळे तुकाई टेकडीवर छान हिरवळ होती.बाणेश्वराचे दर्शन घेऊन अमित उंच टेकड़ी चढुन तुकाई मंदिरात आला. तुकाई देवीचे दर्शन घेऊन तो तिथेच एका बाजूला शांत बसून राहिला.शांत मनाने मूर्तिकडे पहात असता........ टॉक sss (नकळत त्याने फास्टर फेणे सारखा आवाज काढला.) आणि शांत झालेल्या मनात आता एकएक धागा उलगडु लागला.संपूर्ण घटना पाहता अमितला काही मुद्दे समोर आले आणि जे समोर आले ते असे १) त्याचे अकाउंट कोणीतरी हॅक केले होते.२)कोणालातरी त्याचा पासवर्ड माहीत झाला आणि त्याने हे केले आहे.३)कसलातरी वायरस आहे ज्याने असे मेसेज फॉरवर्ड झाले.४) किंवा असे काहितरी घडले आहे जे सध्या तरी आपल्या आकलना पलीकडे आहे. आता या चार पैकी एका कोणत्या तरी एका कारणाने हे सगळे घडले आहे आणि तेच तर आपल्याला शोधायचे असे त्याने ठरवले. क्रमश

स्क्रिन शॉट

( विशेष सूचना- सदरील कथा व यातील व्यक्ति त्यांची नावे, प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे.
सोशल नेटवर्क म्हणजे सर्वप्रकारचे फोटो,व्हिडिओ, लिखाण,माहिती,मैत्री,वाद-विवाद यांचा अफाट महासागर असल्याने पुढील कथा कोणाला आपल्या जवळची वाटली तर तो योगायोग समजावा. )

अमितने नेहमी प्रमाणे सकाळचा नाष्टा झाल्यानंतर घरच्यांशी ठरल्याप्रमाणे रात्री बंद केलेला मोबाईल व त्यावरील डाटा फेसबुक,व्हाट्स अप वरील नोटिफिकेशन पाहण्यासाठी सुरु केला. अपेक्षे प्रमाणे सतत टिंग...टिंग येणाऱ्या आवाजाने तो सुखावला. जवळ जवळ 1.30 ते 2 मिनिट नोटिफिकेशन्सचा पाऊस सुरु असलेला आवाज थांबला आणि सवयी प्रमाणे प्रथम आपल्या वॉलवर त्याने नजर टाकली आणि त्याला शॉकच बसला.

अशक्य !!! शक्यच नाही !!! अमित मनातल्या मनात बोलला. अभिषाने टाकलेला स्क्रिन शॉट पाहताच तो जबरदस्त हादरला.....  या पहिल्या झटक्यानंतर त्याला अजुन एक मोठा झटका त्याने कॉमेंट्सचा आकड़ा पाहिल्यावर त्याला बसला ....
तब्बल 689 कॉमेंट्स पाहुन तर त्याला दरदरुन घाम फुटला....अचानक बसलेल्या या धक्यातून सावरायला त्याला 5 ते 7 मिनिट लागले.

आता त्याने थरथरत्या बोटाने स्क्रिनवर कॉमेंट्स ओपन केल्या आणि त्याच्या फ्रेंडलिस्ट मधिल मूली,महिला,ज्येष्ठ नातेवाईक,शाळा कॉलेज, कामातील मित्र यांना त्याच्या प्रोफाईल वरुन केलेल्या असभ्य भाषेतील वेगवेगळ्या प्रकारचे मेसेंजर वरील मेसेजचे स्क्रिन शॉट पाहुन........छातीत आलेली कळ,धूसर झालेली नजर आणि फुटलेल्या घामाने हार्ट अटॅक आल्यावर जशी अवस्था होते तशी त्याची अवस्था झाली.

क्रमशः

रविवार, 2 नवंबर 2014

किंमत.

गेलेला दिवस भुतकाळ होऊन जेंव्हा वर्तमानात येतो तेंव्हा तो त्याची किंमत वसुल करतो.