गुरुवार, 11 सितंबर 2014

टेलीफोन गपशप.

  ट्रिंग .. ट्रिंग .....ट्रिंग ...  ट्रिंग... .

" हेलो,काकु मी मनिषा बोलतेय शेजारच्या संगिताला बोलावता का जरा."

काकु " एक दहा मिनिटाने फोन कर मी बोलावुन आणते."

अर्धा तासाने. ट्रिंग .. ट्रिंग .....ट्रिंग ...  ट्रिंग... .

" हेलो, मी मनिषा बोलतेय."

काकु " हो, संगिता आलीय बोल तिच्याशी."

संगिता " हेलो, कोण मनिषा बोलतेय का ? मी संगिता बोलतेय."

मनिषा " काकु आहेत का जवळ? "

संगिता " नाहि गं मी स्वयंपाक खोलीत ठेवलीय "

संत्या " ए मी बोलतोय, दोन दिवस झाले क्लासला आली नाहिस. परवा बागेत समोरच्या राणे मावशींनी पाहिले आपल्याला घरी सांगीतले का काहि?"

संगिता " नाहि गं भाजी निवडत होते.भाजीवाली चांगली आहे.काहि बोलत नाहि चांगलीच भाजी देते मला."

संत्या " थँक गॉड !!! मी घाबरलेलो ना किती.मग दोन दिवस का नाहि आलीस ? मागे तुला द्यायची चिठ्ठी चुकुन गुड्डीने राणीला दिलेली. काय घाबरलो होतो मी तरी बरं राणीने लगेच फाडुन टाकली नाहितर काहि खरे नव्हते."

संगिता " किती मजा आलेली ना जोशी बाईंची लहान मुलांना काम सांगु नये. चॉकलेट दिले कि काम होतेच असे नाहि. त्यांनी आता बंद करायला पाहिजे ते."

संत्या " ते जाऊ दे दोन दिवस का नाहि आलीस? "

संगिता " अगं मावशी आलीय परवा आई आणि मावशी काहि कार्यक्रम आहे ना त्याला जातात. मग कॉलेज मधुन आल्यावर घरातील कामे मलाच करावी लागतात.उद्या मावशी जाईल परत मग मी येईल क्लासला "

संत्या " ए ठेवतो फोन आता मागे लाईन लागलीय मी वाट पाहिल आपल्या नेहमीच्या ठिकाणी. "

संगिता " हो चालेल मी नोट्स आणते नक्की आणते."

कोई टिप्पणी नहीं: