आपला एक सर्वसाधारण समज आहे कि adam व eve सफरचंद खाल्यामुळे मर्त्य मानव झाले.
छ्या हे शक्यच नसणार हो.आता ज्यांचे लग्न झालेले आहे अथवा जे अजुन अविवाहित आहेत पण प्रेयसी आहे.अशा सर्वांना पटेल तर काय आहे ते पाहुया.
तर समस्त पुरुष मंडळीचा एक अनुभव समान आहे शब्द व भाषा थोडीसी इकडे तिकडे.
adam व eve सुखा समाधानाने रहात होते. स्वर्गातुन देवगण आपली सृष्टी पाहुन खुष होते.सर्व काहि सुरळीत होते.आता सर्व काहि सुरळीत म्हणजे नारदमुनी बोअर होणार हे ठरलेले.तर नारदमुनी भगवंताची परवानगी घेऊन पृथ्वीवर आलेले आहेत.पण दोघेही आपल्यातच रमलेले एकच संवाद त्यात सिरीअल सारखे चटपटीतपणा नाहि त्यामुळे नारदमुनी कंटाळले.आता नारदमुनी म्हणजे कार्टनीस्ट प्राण म्हणतात त्याप्रमाणे सुपर काँम्प्युटर पेक्षा फास्ट मग काय ब्रम्हदेवांना वशिला लावुन सुंदर फुलांची निर्मिती करुन घेतली.रोज एक फुल घेऊन eve समोर यायचे eve चे लक्ष फुलाकडे आले कि एकदा फुलाकडे पहायचे एकदा तिच्याकडे पहायचे आणि तिची स्तुती करत फुल टाकुन द्यायचे. परत दुसर्या दिवशी वेगळे फुल आणायचे परत तिच्याकडे पहायचे तिची स्तुती करायची आणि फुल टाकुन द्यायचे. असे करत असता प्रथम eve लक्ष देत नव्हती.नंतर उत्सुकतेने ती मुनींकडे लक्ष देऊ लागली आता मुनींनी जास्तच स्तुती करणे सुरु केले. हळुहळु eve ला त्यात इंटरेस्ट वाटु लागला. आता नारद मुनींना हे लक्षात येताच त्यांनी स्तुतीसह फुल देणे सुरु केले.
आता eve नारदमुनींची वाट पाहु लागली पण नारदमुनी तर स्वर्गात जाऊन तेथुन adam आणि eve आता काय करतायेत हे पाहु लागले.
नारदमुनी करत असलेल्या स्तुती मुळे eve आता आपल्या सौंदर्याविषयी विचार करु लागली.adam तेच तेच बोलतोय त्याचे आपल्याकडे लक्षच देत नाहि असे वाटुन जगातील पहिले वाक्य उच्चारले-
तुमचे माझ्याकडे लक्षच नाहि.
हेच ते वाक्य ज्याने विश्वाची म्हणजे तुमची आमची निर्मिती केली.
आणि वंशपरंपरेने प्रत्येक पत्नी आपल्या पतीस हे वाक्य बोलु लागली. यातुनच स्त्रीयांना खुष करण्यासाठी पुरुषांनी संगित,कला,वाग्ड्मय,नृत्य यांचा शोध लावला. त्यातीलच हुशार पुरुषांनी सौंदर्य प्रसाधनांचा शोध लावला.
तर मंडळी माझ्यामते असेच काहिसे घडले असेल.
विशेष सुचना- नास्तिक मंडळी नारदमुनी मान्य नसेल तर सरळ शॉर्टकट मध्ये adam ला निखिल वागळे सर आजचा सवाल मध्ये विचारतात " eve कोणत्या रंगाच्या फुलांमध्ये सुंदर दिसते? " आता समस्त नवरे मंडळी मान्य करतील कि साडीचे दुकानातील अनुभवानुसार हा प्रश्न adam साठी कसा असेल.
शनिवार, 13 सितंबर 2014
बायका म्हणजे बायका असतात.
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें